June 29, 2025 12:59 pm

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते धनंजय देशमुख यांचा बालभारतीवर निवडीबद्दल सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते धनंजय देशमुख यांचा बालभारतीवर निवडीबद्दल सत्कार

(निलेश गायकवाड)

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळा (बालभारती) वर निमंत्रित सदस्यपदी निवड झालेबद्दल प्रा. धनंजय शामराव देशमुख (वडापुरी) यांचा इंदापूर येथे सत्कार करण्यात आला.
प्रा. धंनजय देशमुख हे अकलूज येशील महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रामटेक – नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृती विद्यापीठातून योगशास्त्र या विषयात एम. ए. ची पदवी संपादन केली आहे. तसेच ते ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघ, आर्ट ऑफ लिविंग व वडापुरी येथील श्रीनाथ परिवाराच्या माध्यमातून गोरगरीब निराधारांसाठी सार्थक दिपावली, प्रत्येक वर्षी 31 डिसेंबरला दारू नको दूध प्या, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासारख्या अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांचे या निवडीबद्दल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. बालभारतीच्या माध्यमातून बालकांच्या विकासासाठी काम करणार असल्याचे याप्रसंगी प्रा. देशमुख यांनी सांगितले. यावेळी अमोल चंदनशिवे, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!