June 28, 2025 10:39 pm

निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत २ एप्रिल रोजी अमळनेर शहरात मतदान जनजागृती मॅरेथॉन

अपनी भाषा में पढ़े! Translate

निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत २ एप्रिल रोजी अमळनेर शहरात मतदान जनजागृती मॅरेथॉन..

 

अमळनेर : विक्की जाधव..

भारत निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत अमळनेर उपविभागातर्फे २ एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे यादृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे. १८ वर्षे वयावरील सर्व पुरुष व महिला उमेदवारांसाठी ही खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. २ रोजी सकाळी साडे सात वाजता जिल्हापरिषद शासकीय विश्रामगृहापासून स्पर्धेला सुरुवात होऊन धुळे रोडवरील प्रवेशद्वारावर स्पर्धा संपेल. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला अंतिम रेषेच्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच पुरुष व महिला स्पर्धकांना पहिल्या तीन क्रमांकाना बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाने या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!