अमळनेर हॉटेलमध्ये रंगपंचमी खेळण्यावरूनवाद तिघांसह इतरांनी दोघांना जबर मारहाण केल्याची घटना २५ रोजी दुपारी घडली. त्यामुळे रंगाची होळी बेरंग होऊन काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते
याबाबत अधिक माहिती अशी कीं सुमित हरिशकुमार राहुजा (सिंधी कॉलनी) हा आपल्या मित्रांसह चोपडा रोडवरील राज पॅलेस मध्ये जेवायला बसला होता. त्यावेळी तेथे गणेश दामू जाधव व राजू दामू जाधव हे
टेबलवर रंगपंचमी खेळत होते. हॉटेलचे वेटर विकी दरडा त्यांना हॉटेल खराब होत आहे तुम्ही बाहेर रंगपंचमी खेळा नंतर या असे सांगीतले तर दोघांनी वेटरला शिवीगाळ केली.हे भांडण आवरायला सुमित राहुजा गेले त्यांनाही दोघांना शिवीगाळ केली. सुमित घरी जाण्यासाठी हॉटेल बाहेर निघाला तेव्हा राजू व गणेश यांनी आणखी दोन तीन जणांना फोन करून बोलावून घेतले या सर्वांनी सुमितला जबर मारहाण केली त्याला मोठ्या प्रमाणात इजा झाली असुन त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले शेवटी गुन्हा दाखल झाला.