करमाळा नगरपालिकेचा स्वच्छतागृहासाठी असाही जुगाड

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – करमाळा शहरातील सार्वजनिक शौचालये, मुतारी ह्या नेहमी अस्वच्छ असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून नगरपरिषदेस वारंवार प्राप्त होत असतात. तसेच शौचालयाच्या अस्वच्छेतेमुळे, शौचालयातील टाक्यातील पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिक हैराण होवून नगरपरिषदे विरूध्द संताप व्यक्त करताना अनेकदा पाहिले आहे. नागरिकांच्या समस्येचे निराकरण होणेसाठी नगरपरिषेच्या नूतन प्रभारी आरोग्य निरीक्षक विनोद राखुंडे यांनी स्वत:च्या मनाचा जुगाड लावत छोटया चार चाकी गाडीवर छोटया जनरेटरसह, 1000 लिटरच्या पाण्याची टाकी व प्रेशर पाईप लावून शौचालये, मुतारी स्वच्छतेचे काम हाती घेतली आहे. त्यांच्या या जुगाडामुळे मध्यंतरी अभिनेता अमिर खानचा आलेला थ्री इडियट्स या चित्रपटाची या निमीत्ताने आठवण झाली. अभिनेता अमीर खानने ही स्वत:च्या बुध्दीचा वापर करीत अनेक जुगाड करीत युवकांना प्रेरित करण्याचे काम केलेले होते. या चित्रपटावरूनच का होईना नगरपरिषदेने नागरिकांच्या समस्येचे निराकरण होण्यासाठी असा जुगाड केला असावा. नगरपरिषदेने केलेल्या या जुगाडाची चर्चा करमाळा शहरात रंगत असून या निमीत्ताने का होईना शौचालय, मुतारी स्वच्छतेचे काम नगरपरिषदेने हाती घेतल्याचे समाधान नागरिकांमधून व्यक्त होताना पहायला मिळत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!