‘जग बदलणारा बापमाणूस’ 100 दिवसात 7 वी आवृत्ती प्रकाशित ; पुस्तक प्रेमी मध्ये एकाच पुस्तकाची चर्चा !

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘जग बदलणारा बापमाणूस’ 100 दिवसात 7 वी आवृत्ती प्रकाशित ; पुस्तक प्रेमी मध्ये एकाच पुस्तकाची चर्चा !

प्रतिनिधी / विकी ओहोळ
8446119158
दौंड – जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तक सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा लेखक जगदीश ओहोळ यांनी प्रेरणादायी पद्धतीने घेतलेला वेध वाचकांना भुरळ पाडत आहे.
नवी पिढी पुस्तके वाचत नाही, पुस्तके खरेदी करत नाही” असे अनेकांकडून सध्या बोलले जात आहे. परंतु ‘जग बदलणारा बापमाणूस: या पुस्तकाच्या विक्रीने हा गैरसमज मोडून काढला आहे. आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत, त्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत लिहिलेले पुस्तक दिले तर ते आवर्जून खरेदी करून वाचतात असे या पुस्तकाच्या विक्रीच्या विक्रमातून दिसून येत आहे. प्रेरणादायी व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी प्रेरणादायी पद्धतीने लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक 3 डिसेंबर 2023 रोजी पुण्यात फुलेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात प्रकाशित करण्यात आले.
त्यानंतर अवघ्या शंभर दिवसात म्हणजे 13 मार्च 2024 पर्यंत या पुस्तकाच्या सात आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या आहेत, असे प्रकाशिका छाया जायकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या पुस्तकाला तरुणाईकडून विशेष मागणी आहे. तसेच महाराष्ट्र सह महाराष्ट्राच्या बाहेर व अगदी दुबई, अमेरिका, युरोप या देशात ही मराठी वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले आहे. या पुस्तकाबद्दल अनेक दिग्गज विचारवंत लेखक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेले आहेत.

‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकास ज्येष्ठ विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रस्तावना लिहिली असून लेखकाचे पाठराखण पर शब्द प्राच्यविद्यापंडित डॉ. आ ह साळुंखे यांनी लिहिले आहे. समाज कल्याण उपायुक्त विशाल लोंढे, आदी दिग्गज अभ्यासक, विचारवंत व पत्रकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मोटिव्हेशनल पद्धतीने शून्यातून विश्व निर्माण करणारे सर्वांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर, जातसंघर्षाच्या पलीकडे प्रत्येकासाठी कसे प्रेरणादायी आहेत? ते अजून आमच्या वाचनात आले नव्हते अशा प्रतिक्रिया वाचक देत आहेत.
अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमात, वाढदिवसाला, सत्कारासाठी हे पुस्तक लोक एकमेकांना भेट म्हणून देत आहेत,
लवकरच वाचकांच्या मागणीनुसार हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषांतरित आवृत्ती प्रकाशित करू.
असे जगदीश ओहोळ पुस्तकाचे
लेखक यांनी माहिती दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!