दौंड शहरात हातात तलवार बाळगून दहशत माजवणाऱ्या एकास दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून अटक
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – 26 /3/2024 रोजी दौंड शहरात नगरमोरी चौक येथे तुषार जावरे सिद्धार्थनगर दौंड हा युवक आपल्या जवळ धारदार तलवार बाळगून दौंड शहरात व परिसरात दहशत निर्माण करत आहे बातमी मिळतात पोलिस निरीक्षक डोके यांनी दौंड पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथका सोबत सदर ठिकाणी पाठवून तुषार याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे धारदार तलवार मिळून आली त्यास दौंड पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिस नाईक अमीर शेख हे करीत आहेत अशी माहिती मिळाली.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुभाष राऊत,पांडुरंग थोरात नितीन बोरडे विशाल जावळे,आदेश राऊत,अमोल देवकाते यांनी केली.