June 28, 2025 10:04 pm

एसपीडीएम महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांची सैन्यदलात निवड…

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस.पी.डी.एम महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या सैन्य दलात अग्नी वीर म्हणून स्तुती निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्या हस्ते सैन्य दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

शिरपूर येथील एस.पी.डी.एम महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या सैन्य दलात अग्नी वीर यामध्ये घनश्याम माळी ( टी वाय बी एस सी केमिस्ट्री ) ,पंकज आगळे ( टी वाय बी एस सी कम्प्युटर सायन्स ), दीपक पाटील ( टीवाय बीएससी केमेस्ट्री ) ,हर्षल कोळी (एसवाय बीएससी )कल्पेश वाणी (टी वाय बी कॉम ) विवेक महाले (टी वाय बी एस सी केमिस्ट्री )दीपक पवार (टी वाय बीकॉम )हे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या एनसीसीचे विद्यार्थी आहेत .

त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ . तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आला . विश्वस्त रोहित रंधे तसेच एनसीसी प्रमुख प्रा डॉ . परेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले . या प्रसंगी प्राचार्य प्रो एस एस राजपूत उपप्राचार्य । प्रा फुला बागूल उपप्राचार्य प्रा डॉ एस पी महिरे उपप्राचार्य प्रा विलास चव्हाण उपस्थित होते .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!