November 21, 2024 3:22 pm

सातपुडा पर्वत रांगातील आदिवासी बांधवांच्या विविध उत्सवांना सुरुवात..

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोराडी ता.शिरपूर सातपुडा पर्वत रांगातील आदिवासी बांधवांच्या विविध उत्सवांना सुरुवात झाली आहे. आज दि.१४ मार्च बोराडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुलाल्या बाजाराचे चालीरीतेप्रमाणे गाव पाटील यांच्या हस्ते पूजन करून गुलाल उधळण्यात आला. गुलाल्या बाजाराचे पूजन म्हणजेच भोंगऱ्या बाजाराची चाहूल असल्याचे म्हणले म्हटले जाते.

या प्रसंगी कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, सिसकाचे माजी संचालक जयवंत पाडवी, सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा, विशाल पावरा, गाव पाटील पाडवी पावरा, उमरदाचे गाव पाटील भाईदास पावरा,बोराडीचे पोलीस पाटील अनिल पावरा, कोडिदचे पोलीस पाटील भरत पावरा, सरपंच सुखदेव मालचे,भरत पावरा, इंद्रसिंग पावरा, कांतीलाल पावरा, जगदीश पावरा, वासुदेव सत्तेसा, अभिजीत कुवर, मुकेश जाधव, डॉ.अजित पाटील ,सुरेश ठाकूर यांच्यासह बोराडी, उर्मदा, कोडीद येथील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाशिवरात्रीच्या देव मोगरा मातेच्या यात्रा उत्सवानंतर फाल्गुन महिन्याची सुरुवातीला आदिवासी भागातील विविध सण उत्सवांना सुरुवात होते. यात गुलाल्या बाजार, भोगऱ्या बाजार, होळी, मेलादा असे विविध सण स्वतंत्रपणे असल्याने या भागांमध्ये मोठ्या उत्सवाचे वातावरण असते. या उत्सवाच्या काळात आदिवासी समाजामध्ये देव- देवतांचे उपवास, नवास मानतात तर काहींनी गेल्यावर्षी मानलेले नव स खेळण्याची परंपरा आहे.

भोगऱ्या बाजार, होळी, मेलादा महाराष्ट्रातील व मध्यप्रदेश राज्यांच्या पायथ्याशी असलेले आदिवासी गावांमध्ये या सणाचे मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. यावर्षी दि. १८ मार्च (सोमवार)- धडगाव, निवाली(म.प्र) सोलवन(म.प्र), येथून भोंगऱ्या बाजाराला सुरुवात होत आहे. दि.१९ मार्च (मंगळवार) – सुळे, आम्बे, वरूड-भटाणा, पलसुद(म.प्र.).,दि.२० मार्च (बुधवार) – कोडीद, पनाखेड, धवली(म.प्र),दि.२१ मार्च (गुरुवार) – बोराडी, राजपुर(म.प्र.), मालवण(म प्र), बलवाडी(म.प्र).,दि.२२ मार्च (शुक्रवार) – सांगवी, मलगाव, वरला(म.प्र)., मोहिदा(म.प्र), मेणीमाता(म.प्र), वालपुर(म.प्र.) ,दि.२३ (शनिवार) -पलासनेर, वैजापूर, खेतिया(म.प्र), ,दि.२४ (रविवार) – रोहिणी, कर्जाने, हाडाखेड, पानसेमल (म.प्र)., काठी(राजवडी होळी), सेंधवा (म.प्र). येथे भोगऱ्या बाजाराचा समारोप होणार आहे.

भोगऱ्या बाजार संपत नाही तोवरच होळी सणाची स्वतंत्ररित्या ठिकठिकाणी मानाच्या होळीची पूजन केले जाते. व होळी सण संपत नाही. तोवरच मेलादा ,इंधन आधी सणांना देखील मोठ्या प्रमाणावर महत्व आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!