महाराष्ट्र न्याय व विधी विभागाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या नेत्या सपना राजेंद्र मेश्राम उतरल्या मैदानात
रजत डेकाटे प्रतिनिधी नागपूर
उमरेड विधानसभा क्षेत्रात अनेक राजकीय नेते आपला दावा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे त्यामधील एक महिला कार्यकर्त्या सपना राजेंद्र मेश्राम ह्या उमरेड विधानसभेच्या मतदार संघात आपले अस्तित्वात निर्माण करण्यासाठी धडपडत सुरू केले आहे.महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, असाधारण भाग- चार, असाधारण क्रमांक -45 नुसार १४ ऑगस्ट 2023 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 37 नुसार शासनाने असा अध्यादेश काढला की वन्यप्राणी रस्ता ओलांडताना झालेल्या वाहन अपघातामुळे झालेली कोणतीही हानी, इजा किंवा नुकसान यामुळे मानवी जीवितास हानी, मानवाला कायमस्वरूपी दिव्यांगत्व, मानवाला झालेली गंभीर हानी, पशुजीवांची हानी व पशुंना इजा यांसारख्या प्रकरण नुकसान झाल्यास नुकसान भरपाई सुध्दा विचारात घेतली जाणार नाही असे सपना मेश्राम यांनी म्हटले आहे.
सध्याचे युग दळणवळणाचे युग आहे आणि या युगामध्ये वाहन हे दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे. वास्तविक जीवनामध्ये वन्यजीव वाहनाला अपघात करत आहेत कुणीही वाहन चालक स्वतःहून वन्यजीवावर वाहन नेत नाही तर हा एक अचानक घडलेला अपघात असतो त्यामुळे वाहन चालकाला आर्थिक नुकसानीसह जीवितास नुकसानही होत असते त्यामुळे शासन हे त्यावर फक्त आर्थिक नुकसान देत असते, जीव किंवा अपंगत्व भरून देऊन शकत नाही त्यामुळे वन्यजीवांना वाहनामुळे जरी अपघात झाला तरी त्याची सर्वात जास्त झड मानवाला पोहोचते. त्यामुळे याची नुकसान भरपाई ही मानवाला मिळायला हवी त्यामुळे राज्य शासनाने केलेला अद्यादेश मानवी जीवनास अन्यायकारक आहे. वन्यजीवामुळे वाहणाचा अपघात नुसते सामान्य जनतेचेच नाही वन अधिकाऱ्यांचेही अपघात झाले आहे. त्यामुळे अशा नुकसानीमध्ये मानवाला नुकसान भरपाई ही मिळायलाच पाहिजे त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय मानवी जीवनास हानिकारक असल्याने निर्णय दुरुस्ती करावी अशी मागणी वंचीत पक्षाच्या नेत्या सपना राजेंद्र मेश्राम . राजेंद्र मेश्राम.रमेश उके.संजय भोयर. युवराज कुर्जेकार .यांनी तहसीलदार कुही यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे दिला आहे.