वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खंजरीच्या माध्यमातून जागृती चा आवाज आणि समाजाला चांगले विचार दिले :-विशाल दा. निंबाळकर
प्रतिनिधी-विजय केळझरकर
विठ्ठल मंदिर प्रभाग हनुमान मंदिर देवस्थान (विश्वाकर्मा चौक) मध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आले होते. या पुण्यस्मरण सोहळ्या मध्ये व्याख्यान आणि प्रभागात प्रभात फेरी आयोजकातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमाला प्रभागातील गणमान्य वर व शेकडो नागरिक उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेवक विशाल निंबाळकर व माजी नगरसेवक प्रशांत दानव यांच्या सत्कार व सन्मान करण्यात आला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माणसाच्या विकृतीच्या चिरफाड करण्याचे काम केले. खंजरीला आपली शस्त्र समजून बॉर्डर वरती जाणारे राष्ट्रसंत होते. खंजरी पासून 1942 सालच्या युद्धात इंग्रजाचा विरोधात त्या लढाईमध्ये सामील झाले आणि एवढी ताकद या लोककलेच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून करीत होते असे विशाल निंबाळकर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त बोलत होते.