November 22, 2024 4:30 am

भूमिपुत्र म्हणणाऱ्यानी अमळनेर ता दुष्काळ असताना देखील तालुक्याकडे पाठ फिरवली..

अपनी भाषा में पढ़े! Translate

भूमिपुत्र म्हणणाऱ्यानी अमळनेर ता दुष्काळ असताना देखील तालुक्याकडे पाठ फिरवली..

अमळनेर ता. पातोंडा येथे भारत राष्ट्र समितीचे अमळनेर विधानसभा क्षेत्र समनव्ययक शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी
रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी वर्ग व वाहनांना तासभर ताटकळत बसावे लागले होते. आंदोलकांच्या मागणीनुसार एका तासानंतर तहसीलदार प्रदिप सुराणा दाखल झाल्यावर शेतकऱ्यांनी निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
शेतकऱ्यांना सन 2021 चे अतिवृष्टीचे 54 कोटी रुपयांचे अनुदान त्वरित देण्यात यावे, सन 2023 चा खरीप पिकांचा पीक विम्याची थकीत 75 टक्के रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी, अमळनेर तालुका दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देणे, रब्बी हंगामात झालेल्या गारपिट नुकसान भरपाई त्वरित देणे, शेतकऱ्यांचे पीक कर्जे सरसकट माफ करणे, शेतकऱ्यांना पी. एम. किसानचा निधी न मिळणे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते.

तालुक्याचे मंत्र्यांनी बारामती, चाळीसगाव आदी तालुक्यांत दुष्काळ नसताना देखील दुष्काळ घोषित करून निधी उपलब्ध करून दिला मात्र भूमिपुत्र म्हणणाऱ्यानी अमळनेर तालुका दुष्काळ असताना देखील मात्र अमळनेर तालुक्याकडे पाठ फिरवली अशी टीका शेतकऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर केली. मदत व पुनर्वसन मंत्री असूनही भूमिपुत्र आमदार अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत नसल्याची खंतही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. जोपर्यंत प्रांताधिकारी व तहसीलदार आंदोलन स्थळी येत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुटणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने तहसीलदार प्रदिप सुराणा दाखल झाल्यानंतर शेतकरी नेते शिवाजी पाटील, दिलीप पाटील, प्रकाश लांबोळे, संजय पवार आदींनी आपल्या मागण्या व शेतकऱ्यांच्या व्यथा तहसीलदार समोर मांडल्या. तुमच्या मागण्या व व्यथा प्रशासनाच्या वतीने शासनाकडे मांडून न्याय मिळवून देणार असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना तहसीलदार यांनी केल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!