रात्री घराच्या छतावर फिरत असताना एकाचा पाय घसरून आकस्मित मृत्यू..
अमळनेर -शहरातील बालाजीपुरा येथील घटना गजानन रामदास धांडे (वय 47) हे 12 रोजी जेवण झाल्यानंतर आपल्या पत्नीसह घरच्या दुसऱ्या मजल्याच्या
छतावर शतपावली करत होते. त्यांची पत्नी फोनवर बोलत असताना गजानन उलट पावले मागे चालत असताना अचानक तोल जाऊन खाली काँक्रीट
रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. असून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.