November 21, 2024 3:51 pm

महिला दिनानिमित्त परीट महिला मंडळाच्या भगिनींनी महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला..

अपनी भाषा में पढ़े! Translate

महिला दिनाच्या निमित्ताने परीट महिला मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.आईसाहेब आशाताई रंधे यांच्या अध्यक्षतेखाली, परीट महिला प्रदेशाध्यक्ष सीमाताई रंधे,रजनीताई लूंगसे,प्रमुख पाहुणे मनीषाताई वर्मा यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा उद्यान येथे संपन्न झाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. आशाताई रंधे,प्रदेशाध्यक्ष सीमाताई रंधे व महिला मंडळाच्या भगिनींनी संत गाडगे बाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने गाडगे बाबा उद्यान मंत्रमुग्ध झाला. प्रा.मनीषा ताई वर्मा यांनी महिला दिनाच्या दिवशी महिलां विषयी माहिती दिली. महिलांना समान अधिकार प्राप्त झाल्या मुळे आपण पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहे.पूर्वी महिलांना परिवाराची व समाजाची खूप बंधन होती,महिला राजकारणात,नोकरीत,व्यवहारात समान अधिकार प्राप्त झाल्या मुळे आपण खूप नशीबवान आहात.युवा पिढी घडवण्यामध्ये आपला खारीचा वाटा आहे. जिजामाता,सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मी बाई,अहिल्याबाई होळकर,ताराराणी आदींचा आदर्श आपल्या समोर आहे.हाच आदर्श घेऊन आपण जोमाने काम करावे असे प्रतिपादन केले.

आशाताई रंधे, वत्सलाबाई सूर्यवंशी, साळुंखाबाई वाघ, भारतीताई ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धामध्ये विजयी भगिनींचा सत्कार व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम संध्याकाळी ५ पासून ते रात्री ८ पर्यंत घेण्यात आला.त्यानंतर सीमाताई रंधे यांनी अल्पोहराचे नियोजन केले. सर्वांनी अल्पोहराचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचा निमित्ताने खूप धमाल केली व मजा केली.

कार्यक्रमाचे आयोजन परीट महिला मंडळाचे अध्यक्ष सुरेखाताई बेडिस्कर, उपाध्यक्ष दिपाली सूर्यवंशी,सचिव पूजा लुंगसे,सविता बेडिस्कर,संगीता सूर्यवंशी,मनीषा भिलाने,अलका येशी,कल्पना येशी,शीतल सैन्दाने,विनिता जाधव व रुपाली वाघ आदींनी आयोजन केलं.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!