एन. डी.पी. एस. कायद्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी अफू उत्पादकावर केली कारवाई.
(निलेश गायकवाड)
NDPS Action (Opium Farming)
एन. डी.पी. एस. कायद्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी अफू उत्पादकावर केली कारवाई.
१ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२४ कालावधीत ग्रामीण पोलिसांच्या विविध पथकांनी तब्बल १४ लाख ८१ हजार रुपये किमतीची ३६५.०२ किलो ग्रॅम अफूची (खसखस) शेती उध्वस्त करीत ऐवज जप्त केला आहे..
अफू, गांजाचे उत्पादन घेणाऱ्यासह तस्कराविरुद्ध यापुढेही कारवाईचा बडगा कायम ठेवण्यात येणार आहे.
झटपट पैसा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाच्या नावाखाली अफू, गांजाची लागवड करू नये..अन्यथा संबंधितावर एनडीपीएस कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.