बोराडी फार्मसी महाविदयालयातील विदयार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
किसान विदया प्रसारक संस्थेचे इंन्स्टीटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी ता. शिरपुर जि. धुळे. संस्थेतर्फे विदयार्थ्यांना नेहमीच गुणवत्ता पुर्ण व दर्जादार शिक्षण मिळावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव श्री. निशांत रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, नेहमी संस्थेचा व महाविदयालयाच्या विकासासाठी मार्गदर्शन करतात नॅक मांनाकित किसान विदया प्रसारक संस्थेचे इंन्स्टीटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी अंतर्गत बी. फार्मसी व एम. फार्मसी तसेच क.ब.चौ.उ.म.वि. अंतर्गत पीएच. डी. संशोधन केंद् कार्यरत आहे फार्मसी शिक्षणानंतर औषधनिर्मिती मधील बहुराष्ट्रीय फार्मा कंपन्यामध्ये नोकरी मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते योग्य मार्गदर्शन व नोकरीची संधी उपलब्ध करुन देणे हेच ध्येय हेरुन महाविदयालयाने मेगाकॅम्पस मुलाखातीचा उपक्रम राबवीला
मुलाखतीसाठी महाविदयालयातील तसेच संपुर्ण महाराष्ट्रातील विविध फार्मसी महाविदयालयातील अंतिम वर्षातील बी. फार्मसी व एम. फार्मसीचे विदयार्थी तसेच उत्तीर्ण विदयार्थी असे एकुण 526 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवीला डिस्टिल कॉपोरेशनचे ऑपरेशन मॅनेजर प्रदिप मोरे एच.आर.अधिकारी चितांमण चव्हाण यांनी मुलाखती घेतल्या या मेगाकॅम्पस मुलाखतीमध्ये महाविदयालयातील 115 विदयार्थ्यांची निवड झाली महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील उपप्राचार्य प्रा. कल्पेश एस. वाघ व ट्रेनिंग प्लेसमेटचे प्रमुख प्रा. उदय बच्छाव समन्वयक डॉ. सचिन महाजन, प्रा. पंकज पाटील, प्रा स्वप्नील चौधरी, प्रा. विकास पाटील प्रा. हर्षजीत सिसोदे व प्रा. कल्पेश मोरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी या मेगाकॅम्पस मुलाखतीसाठी नियोजन केले.
मेगाकॅम्पस मुलाखातीमध्ये निवड झालेल्या विदयार्थ्यांचे किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव श्री. निशांत रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच श्री. राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. शशांक रंधे, नगरसेवक श्री. रोहीत रंधे विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.