June 29, 2025 12:46 pm

रोशेवाडी रस्त्यावर गतिरोधक बसवा अन्यथा युवासेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा कोर्टी रस्त्यावर असलेल्या रोशेवाडी येथे गतिरोधक बसावा यासाठी युवासेना (ठाकरे गट ) उपजिल्हाप्रमुख मयुर यादव यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी युवासेनेकडुन निवेदनात नमुद करण्यात आले की करमाळा पुणे रस्ता हायवे झाल्याने या रस्त्यावरुन भरधाव वेगात वाहने ये जा करत आहेत त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या रोशेवाडी येथे दर एक दोन दिवसाला अपघात होत असून अनेक जणांना गंभीर दुखापत झाली आहे .शाळकरी मुलांना देखील याची इजा पोहचलेली आहे . सदर रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवल्यास अपघात टळू शकतात त्यामुळे तात्काळ गतिरोधक बसवून होणारे अपघात टाळावेत या उपर बांधकाम विभागाकडून दूर्लक्ष झाल्यास होणाऱ्या अपघाताची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहिल असा इशारा युवासेनेकडुन देण्यात आला .

या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख मयुर यादव ,तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, शहरप्रमुख समीर हालवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे आदित्य जाधव डॉ सौरभ थोरात, उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!