शिक्षणशास्त्र महाविद्यालय ,नंदुरबार येथे महिला दिवस साजरा
प्रतिनिधी रविता कुंभार
नंदुरबार- बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव व नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नंदुरबार व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबीर उमज ता. जि. नंदुरबार येथे दि.८/०३ /२०२४ वार – शुक्रवार रोजी प्रा. डॉ.दिनेश देवरे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि युवक तसेच डॉ. एन.जी. वसावे मॅडम यांनी विद्यार्थी विकास आणि आत्मविश्वास या विषयावर विद्यार्थी व विद्यार्थीनीना मार्गदर्शन करण्यात आले तसेच डॉ.कैलास एस.चौधरी सर (कार्यक्रम अधिकारी रा.से.यो.)यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी NSS Camp च्या सर्व बी.एड.च्या विद्यार्थींनींना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक विद्यार्थी तसेच प्रा.वर्ग व डॉ .डी.ए.पाटील मॅडम (महिला कार्य.अधि.रा.से.यो.) यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले . त्यांनी विद्यार्थाना स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य
स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व
दरवर्षी 8 मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ अर्थात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे.
इतिहासात डोकावलात तर मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. नंतर 1910 मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला. यानंतर दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन अर्थात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – पृथ्वीराज गांगुर्डे , आभार – रामसिंग पावरा , पंकज बोरसे व सूरज बागुल ने महिलांविषयी जनजागृती वर गोंधळ सादर केले.