June 30, 2025 1:37 am

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने रोड मार्च

अपनी भाषा में पढ़े! Translate

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने रोड मार्च

(निलेश गायकवाड)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रोड मार्च
भवानीनगर लवकरच लोकसभेची निवडणूक जाहीर होणार असल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने भवानीनगर ते जंक्शन असा रोड मार्च काढण्यात आला होता.

वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भवानीनगर लासुर्णे जंक्शन असा रोड मार्च काढण्यात आला होता यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विजय टिळकेकर पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी सी आय एफ एस चे कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते शनिवारी सकाळी बारामती इंदापूर रस्त्याने सायरन वाजवत निघालेली पोलीस गाडी व गाडीच्या मागे चालत असलेले पोलीस कर्मचारी सीआयएफएस कर्मचारी व होमगार्ड व त्यांच्या मागून येत असलेला पोलिसांचा पिंजरा असे दृश्य ग्रामस्थांना दिसू लागल्याने ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला रस्त्यावरून चाललेला पोलिसांचा रोड मार्च पाहून रस्त्यावरून चाललेली दुचाकी चार चाकी वाहने रस्त्याच्या बाजूला उभी राहू लागली लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने हा रोड मार्च काढण्यात आला होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!