June 29, 2025 9:42 am

केम गावातील श्री उत्तरेश्वर महाराज देवस्थान यात्रेनिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष व श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- महाराष्ट्र माजी राज्य मंत्री वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा वसा घेत प्रहार करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी आज एक वेगळाच आदर्श निर्माण करत अतिशय भव्य अशा श्री उत्तरेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त,कौतुकास्पद काम करत भाऊंच्या च्या पावलावर पाऊल ठेवत संपूर्ण दिवसभर केम गाव व मंदिर परिसराची स्वच्छता करून एक वेगळाच आदर्श घालून दिला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील महाराष्ट्र मध्ये केम हे गाव कुंकू साठी प्रसिद्ध आहे या गावांमध्ये साधुसंतांची रंगभूमी म्हणून मानली जाते. या गावांमध्ये श्री उत्तरेश्वर मंदिर ग्रामदैवत म्हणून मानले जाते,आजू बाजू गावातील भक्तजन या देवाला श्रद्धा स्थान मानतात केम गावातील पंचक्रोशीतील या देवाचे श्रद्धा ठेवतात प्रसिद्ध ऐतिहासिक स्थान म्हणून या ग्राम देवताची ओळख आहे या देवाची यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली जाते, या यात्रेसाठी अनेक वर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन जेसीबी देऊन देवस्थान साफसफाई साठी मदत करत असते,श्री उत्तरेश्वर देवस्थान मंदिरातील परिसर स्वच्छ यात्रेनिमित्त संत गाडगेबाबा महाराज ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी केम ग्रामपंचायत मेंबर ,केम पंचक्रोशीतील युवक वर्ग, सामाजिक ,राजकीय नागरिक व्यापारी ,देवस्थान ट्रस्ट,करत आहेत.
यावेळी उपस्थित, प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर , बापू नेते तळेकर,करमाळा मार्केट कमिटी संचालक सागर राजे दौंड, श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपचे अच्युत काका पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक सागर राजे तळेकर, पैलवान महावीर आबा, युवा नेते महेश तळेकर सर, तळेकर,, सामाजिक कार्यकर्ते सचिन रणशिंगारे, सोसायटी मा. चेअरमन बाळासाहेब देवकर, व्हॉ,चेअरमन चंद्रकांत दोंड,उपसरपंच सुलतान मुलानी ,आनंद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सागर कुरडे ,पिंटू ओहोळ, गोरख काका पारखे, दादासाहेब गोडसे योगेश ओहोळ,विष्णू अवघडे,प्रहार युवा जिल्हा उप अध्यक्ष युनूस पठाण, दादा दुर्गुळे बाळू तळेकर,अनेक प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.🙏

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!