राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी अजिंक्य माडगे यांची नियुक्ती
(निलेश गायकवाड)
भिगवन- भिगवण (ता.इंदापूर ) येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मा. अजिंक्य माडगे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड ही राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. अजित पवार यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित करण्यात आली आहे.
ही निवडी येणाऱ्या काळातील निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या मानली जात आहेत. माडगे यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात तसेच उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी बजावलेले आहेत. माडगे यांच्या पाठीमागे युवा पिढी आकर्षित आहे.विविध सामाजिक उपक्रम माडगे यांनी राबविलेले आहेत.निवडीचे पत्र पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
सदर निवड करताना भिगवण परिसरातील ग्रामस्थ तसेच युवा वर्ग उपस्थित होता.माडगे यांनी बोलताना सांगितले येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणार व पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले.