June 29, 2025 2:14 pm

मा.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांची छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयास भेट..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मा.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांची छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयास भेट..

(निलेश गायकवाड)

मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी आज दि. 3 मार्च रोजी भिगवन येथील छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचालयास भेट दिली. सदर वेळी हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघ पूणे जिल्हा वतीने मराठा महासंघाचे जेष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब खराडे, बाळासाहेब भांडवलकर, पराग जाधव सतीश काळे.जयदीप जाधव.सुनिल काळे.सुभाष फलफले , छगन वाळके हर्षवर्धन ढवळे विशाल धुमाळ दत्तात्रय जाधव उमेश दीडवळ विकास वाघ राहूल जाचक बापू जानभरे व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर वेळीं इंदापूर येथील विलासबापू वाघमोडे हे उपस्थित होते.वाचनालयाचे अध्यक्ष ॲड पांडूरंग जगताप यांनी वाचनालय बांधण्यासाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. मा.हर्षवर्धन जी पाटील साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डिजिटल लायब्ररीचे महत्व पटवून दिले. वाचनालया तर्फे आयोजित केले जात आसलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेस उपस्थित न राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. वाचनालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे व त्यातून वाचक वर्ग कसा वाढवता येईल याचे नियोजन करण्यास सांगितले सदर वेळीं आभार ग्रंथपाल दादा रणशिंग यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!