June 29, 2025 7:27 pm

सुनेत्रा पवार यांच्या गाठीभेटीमुळे सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढली;अ.भा. मराठा महासंघ द्वारा संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयास भिगवण सदिच्छ भेट

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुनेत्रा पवार यांच्या गाठीभेटीमुळे सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढली;अ.भा. मराठा महासंघ द्वारा संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयास भिगवण सदिच्छ भेट

(निलेश गायकवाड)

बारामती येथील एन्व्हायरमेंट फोरमच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्राताई पवार यांनी गुरुवार दि. २३ फेब्रुवारी रोजी अ.भा. मराठा महासंघ द्वारा संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट दिली. शिवजयंती निमित्त वाचनालयाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमाले संदर्भात त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी त्या येणार होत्या, परंतु काही अनपेक्षित कामामुळे येऊ शकल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कै. शंकरराव गायकवाड यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाचे वृत कळल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याकरिता त्या भिगवण येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वाचनालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महासंघाच्या उपस्थित महिला कार्यकर्त्या डॉ. सौ. प्राची थोरात, सौ. तृप्तीताई जाधव, सौ. संगीता मोरे, सौ. जयाताई साखरे, सौ. रोहिणी वाळके. सौ. महादेवी डिडवळ, सौ. राणी लंगोटे, कु. वैष्णवी लंगोटे यांनी त्यांचे स्वागत केले.
वाचनालयाच्या कार्यालयाकरिता भव्य वास्तू बांधण्यात येणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष व मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड पांडुरंग जगताप यांनी यावेळी दिली. या वास्तु करिता आर्थिक मदतीच्या दृष्टीने एक निवेदन त्यांना सादर करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे माध्यमातून नावीन्य पुर्ण योजनेअंतर्गत मदत करण्याचा मी प्रयत्न करते असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
बरेच दिवसापासून येथील मराठा महासंघाची शाखा व त्या अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या वाचनालयाचे कार्य मी ऐकून होते. त्यानुसार यापूर्वीही येथे येण्याची इच्छा होती. ती जरी आजपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही, तरी येथून पुढच्या काळात मला आपली नेहमीच भेट घ्यावी लागणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्राताई असतील याचे संकेत मिळत आहे.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री किरण गुजर, डी. एन. जगताप, प्रतापराव पाटील, तुकाराम बंडगर, प्रमोद नरुटे हे त्यांच्या समवेत होते. मराठा महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश बापू ढवळे, मुख्य सल्लागार. डॉ. जयप्रकाश खरड, महासंघाच्या भिगवण शाखेचे शाखाध्यक्ष छगन वाळके, कार्याध्यक्ष डॉ. संकेत मोरे, भरत मोरे, सुभाष फलफले, अजितराव रणदिवे, के. डी. भांडवलकर, विकास वाघ, बाळासाहेब ननवरे ,शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड, हर्षवर्धन ढवळे, विशाल धुमाळ या सदस्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
एका अपघात ग्रस्त अपंग कार्यकर्त्याला भिगवण एस. टी. बस स्थानकावर भेळ विकण्याची संधी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मिळवून दिल्याबद्दल महासंघाचे कार्यकर्ते नितीन साखरे यांनी व्हीलचेअर वर येऊन आपली पत्नी सौ. जया साखरे यांचे सह सौ. सुनेत्राताईंना पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!