हजारीपहाड येथे माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी.
✒️ रजत डेकाटे -प्रतिनिधी नागपूर
नागपूर :- नागपूर येथील हजारीपहाड येथील वायुसेना नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर महिलाच्या आघाडीच्या उपाध्यक्षा संघमित्रा पाटोळे यांच्या उपस्थितीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या कुसुम गेडाम उपस्थित होत्या.
महिलांनी त्रिसरण पंचशील ग्रहण करून माता रमाबाई आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन केले
यावेळी सुमित गेडाम वर्षाताई देठे, सविता मेश्राम,सिमा वानखेडे,अरुणा देठे,पंचशिला शेंडे, आशाताई, मीनाताई गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या.