June 29, 2025 12:51 pm

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करमाळा येथे पदाधिकाऱ्यांची घेतला आढावा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघातील दहिवडी, माळशिरस, टेंभुर्णी येथे ‘राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा’ कार्यक्रम घेतला. यावेळी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जंगी स्वागत केले. माढा विधानसभा मतदारसंघातील ओम साईराज मंगल कार्यालय अकलूज चौक टेंभुर्णी येथे सभा संपन्न झाली. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महेबूब शेख यांनी करमाळा येथे येऊन, राष्ट्रवादी युवकच्या करमाळा शहराध्यक्षपदी नूतन निवड झालेले आमिर तांबोळी यांच्या घरी भेट देऊन, त्यांना राष्ट्रवादीच्या वाढविस्तारासंदर्भात सूचना देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जीन मैदान येथील तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांच्या संपर्क कार्यालयात येऊन संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मांढरे -पाटील यांना सांगितले की, करमाळा तालुक्याच्या दृष्टीने बूथनिहाय कमिट्या करा. तसेच नवनवीन कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये काम करण्याची संधी निर्माण करून द्या.

यानंतर तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी आजपर्यंत करमाळा तालुक्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने केलेल्या कार्याचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखविला. व इथून पुढे ही पक्ष वाढीसाठी निरंतर काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी मा.तालुकाधक्ष संतोष वारे, ग्राहक संरक्षण प्रदेश सरचिटणीस प्रा. गोवर्धन चवरे सर, अविनाश वाघमारे व शहर उपाध्यक्ष केतन इंदूरे सह इतर ही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून प्रदेशाध्यक्षांचे जंगी स्वागत केले. यानंतर रंभापुरा चौकात सुध्दा कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत वाट बघून, राष्ट्रवादी करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप यांनी कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे जंगी स्वागत केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!