June 30, 2025 1:32 am

संत गाडगे बाबा सभागृह येथे धोबी, परीट,वरठी समाज महिला मंडळाचे विविध कार्यक्रमाने….

अपनी भाषा में पढ़े! Translate

संत गाडगे बाबा सभागृह येथे धोबी, परीट,वरठी समाज महिला मंडळाचे विविध कार्यक्रमाने….

प्रतिनिधी-विजय केळझरकर

दिनांक 28 जानेवारी रोजी संत गाडगे बाबा सभागृह दाद महाल वॉर्ड चंद्रपूर येथे धोबी, परीट,वरठी समाज महिला मंडळाचे हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले .

कार्यक्रमात उद्घाटक म्हणून सौ. मोनाली कुरुडकर (एक्साइज डिपार्टमेंट ) ह्या होत्या. तर व्यासपीठावर अध्यक्ष धोबी समाजाच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष संगीता दुरुटकर ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदिनी चुनारकर ,रंजना जाधव,आणि कल्पना टेंबेकर ह्यांनी पद भूषविले.
सर्वप्रथम गाडगे महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. नंतर सावित्री बाई फुलेंच्या आणि गाडगेमहारा जांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
नंतर व्यासपीठावरील अतीथी चे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन रिना बरबटकर ह्यांनी अतिशय मोहक वाणीने केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांसाठी संगीत खुर्ची ,पाककला स्पर्धा, मुलीसाठी रांगोळी स्पर्धा ,आणि लहान मुली मुलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेत सर्व मुलामुलींनी आणि महिलांनी अत्यंत उत्साहात सहभाग दर्शविला.
स्पर्धेचे परीक्षक मोनाली कुरुडकर ह्यांनी काम पाहिले.
कार्यक्रमात भरपूर संख्येने महिला उपस्थित होते.
स्पर्धेत ज्या स्पर्धकांनी विजय मिळवला त्या सर्वांना प्रमुख अतिथिंच्या हस्ते आकर्षक बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा लोणारे,अंजू लोणारे,नंदिनी पालनवार,सुनीता पाकुलवार,सुनीता लोणारे,मीना बंडीवार, संगीता तुरानकर,लता नल्लुरवार ,ज्योती तंगडपल्लिवार,वैशाली गड्डमवार,मंगला मुक्के,नीलिमा रोहणकर, अनु चूनारकर,आदींनी सहकार्य केले.
शेवटी हळदी कुंकू , आकर्षक वाण,आणि अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्पना टेंबेकर ह्यांनी केले,

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!