June 30, 2025 7:11 am

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलनचा इशारा बारामती राशिन रोडचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जेचे;सचिन आढाव

अपनी भाषा में पढ़े! Translate

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलनचा इशारा बारामती राशिन रोडचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जेचे;सचिन आढाव

(निलेश गायकवाड)

भिगवन – गुणवत्ता नियंत्रण (QC) कोणत्याही उत्पादन प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे.व्यवस्थापन प्रणाली, प्रयोगशाळा आणि फील्ड चाचण्या, निरीक्षण प्रक्रिया आणि पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी यासारख्या विशिष्ट तंत्रांचा वापर करून गुणवत्ता उद्दिष्टे पूर्ण केली जातात. रस्त्याच्या बांधकामाचा विचार केल्यास,तपशील आणि अंदाज प्रभावी गुणवत्ता नियंत्रणासाठी आधार देतात.रस्ते बांधणीत गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी येथे काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. परंतु तो केला नसल्या कारणामुळे बारामती राशिन रोडचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पुणे जिल्हा. युवक अध्यक्ष सचिन आढाव यांच्यावतीने. उपअभियंता सार्वजनिक उपविभाग यांना या संदर्भात निवेदन देऊन सदर बांधकामाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये भविष्यात झालेला रोड हा खचण्याची दाट शक्यता आहे व ती नाकारता येत नाही तसेच रोडचे काम ज्या दर्जाचे होणे गरजेचे आहे तसे झाले नाही.त्यामुळे सदर बांधलेला रोड पुन्हा उकरून व्यवस्थित करण्यात यावा व संबंधित ठेकेदारावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन आढाव यांनी.उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भिगवन तसेच इंदापूर तहसीलदार आणि भिगवन पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!