June 29, 2025 2:40 am

“विकसित भारत-संकल्प यात्रा” रथाचे दौंड शहरामध्ये ठिकठिकाणी स्वागत.

अपनी भाषा में पढ़े! Translate

“विकसित भारत-संकल्प यात्रा” रथाचे दौंड शहरामध्ये ठिकठिकाणी स्वागत.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – केंद्र शासन पुरस्कृत योजनांची परीपुर्णता साध्य करण्यासाठी दि. १५ नोव्हेंबर, २०२३ ते दि. २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत “विकसित भारत-संकल्प यात्रा” राज्यात आयोजित करण्यात आली आहे. “विकसित भारत-संकल्प यात्रा” रथाचे दौंड शहरामध्ये अॅशवुड मेमोरीयल हॉस्पीटल, दौंड येथे आमदार राहुलदादा कुल यांचे हस्ते स्वागत करण्यात आले व संविधान चौक, दौंड येथे वासुदेव नाना काळे व सौ. मंगलताई वाघ यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. नगरपरिषदेकडून वरील दोन्ही ठिकाणी केंद्र शासन पुरस्कृत योजना “आयुष्मान भारत, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आरोग्य तपासणी शिबीर, विविध कर्ज योजना, स्वनिधी से समृध्द योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना” इ. कॅम्प लावण्यात आले. या कॅम्पच्या माध्यमातुन शहरातील नागरीकांना योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी सदर कार्यक्रमासाठी दौंड शहरातील १३०० पेक्षा अधिक नागरीकांनी सहभाग नोंदविला आहे.
विकसित संकल्प भारत यात्रा रथाचे स्वागत व केंद्र शासनांच्या योजनांची माहिती पोहोचविणे व त्याची जनजागृती करणेसाठी मुख्यअधिकारी डॉ. संतोष टेंगले यांचे मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी पार पाडली असल्याचे नगरपालिकाकडून सांगण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!