राज्यपालांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील यांना नवभारत के शिल्पकार पुरस्कार जाहीर
– राज्यपालांच्या हस्ते शनिवारी पुरस्कार प्रदान
इंदापूर :प्रतिनिधी भगवान लोंढे दि.9/1/24
पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील मधील अतुलनीय आणि उत्कृष्ट कार्याबद्दलचा
” नवभारत के शिल्पकार पुरस्कार – 2024 ” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत शनिवारी (दि.13) होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे. या वृत्तपत्र समूहाच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकच्या अनावरणासाठी आयोजित कार्यक्रमात कुलपती व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सदर पुरस्कार राज्यपाल महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.