आम आदमी पक्षाचे संजय सिंग, स्वाती मालीवाल आणि एनडी गुप्ता आणि भाजपचे दोरजी त्सेरिंग लेपचा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.
आम आदमी पक्षाचे उमेदवार संजय सिंह, स्वाती मालीवाल आणि एनडी गुप्ता हे दिल्लीतून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. तिन्ही नेत्यांनी आज निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रे घेतली.
सिक्कीममध्ये, गनाथांग-माचोंग विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री दोरजी त्सेरिंग लेपचा यांना आज सिक्कीममधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. श्री लेपचा यांच्या निवडीचे प्रमाणपत्र सिक्कीम विधानसभा सचिवालयाच्या सचिवांनी जारी केले.