June 30, 2025 4:09 am

रेल्वे प्रशासनाकडून चाकरमान्यांना मासिक पास वितरित होत नसल्याने जनआंदोलन खानदेश विभागात तर्फे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

मध्य रेल्वेकडून मासिक पास वितरित होत नसल्याने  चाकरमान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हयातील खासदार चाकरमान्यांचा मागण्यांकडे दुर्लक्ष करत केराची टोपली दाखवत असल्याने रेल्वे मंडळानें या मागणी बाबत  हस्तक्षेप करत त्वरित  चाकरमान्यांना मासिक पास वितरित करण्याचा निर्णय घ्यावा  तसेच मेमू गाडयांसह सर्व रेल्वे प्रवाशी गाडयांना मासिक पास सेवा सुरू करण्याची मागणी जन आंदोलन खानदेश विभागातर्फे करण्यात आली आहे

मागणीचे निवेदन जनआंदोलन खान्देश विभा गाचे प्रा.गौतम निकम यांनी रेल्वे मंत्रालय दिल्ली भारत सरकार, तसेच 1)मा चेअरमन रेल्वे बोर्ड,नई दिल्ली 2)मा.रेल्वे बोर्ड ऑफिसर,नई दिल्ली 3)मा.जनरल मॅनेजर , सेंट्रल रेल्वे, मुंबई 4)मा.डि आर एम भुसावळ डिव्हिजन भुसावळ जि.जळगाव कार्यालयाकडे केली आहे.

कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून भुसावळ विभाग मासिक पास देण्यास नकारघंटा दाखवत आहे.दुसरीकडे पश्चिम रेल्वे विभागाकडून मात्र मासिक पास वितरण सुरू आहे.अनेक विशेष दर्जा  रद्द झाल्यानंतर  सर्व जलद गाडया  नियमित धावत आहे.पॅसेजर गाडया बंद करून मेमू गाडया रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत मात्र मध्य रेल्वेने अदयापही या रेल्वे गाडयामधून मध्य रेल्वेने मासिक पास धारकांना प्रवासाची  परवानगी दिलेली नाही.कोरोनाचे कारण पुढे करून तसेच वरिष्ठ सुचना येत नाही पर्यंत मासिक पास वितरीत केले जाणार नाही अशी भूमिका मध्य रेल्वे कडून घेतली जात आहे. पश्चिम रेल्वे मासिक पास देत असतांना मध्य रेल्वे मासिक पास देत नाही ही अन्यायकारक  भूमिका असून रेल्वे मंडळाने त्वरित मध्य रेल्वे विभागाला सूचना करून चाकरमान्यांना मासिक पास वितरीत करावे अशी मागणी निवेदनाद्वारे जन आंदोलन खान्देश विभागाचे* *१)प्रा.गौतम निकम २) शत्रुघ्न नेतकर ३) विजय शर्मा ४) योगेश्वर राठोड ५)आबा गुजर बोरसे ६)नाशीर भाई शेख७) मिलिंद अशोक भालेराव ८) गणेश भोई ९) प्रदीप चौधरी १०) अशोक राठोड ११)आर के माळी सर १२)सागर नागणे १३) संदिप पाटील* यांनी केली आहे*

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!