June 30, 2025 8:49 am

बहाळच्या विद्यमान सरपंचांकडून ग्रा.पं.सदस्यांना जीवे मारण्याची धमकी…

अपनी भाषा में पढ़े! Translate

मेहुणबारे पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद..

बहाळ ग्रामपंचायतमार्फत शासनाकडून मिळालेला विविध प्रकारच्या निधीच्या माध्यमातून गावात विकास कामे सुरू आहेत. मात्र विद्यमान काही सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. असा आरोप यापूर्वी देखील विरोधकांनी वेळोवेळी केला आहे.याच अनुषंगाने सरपंचाविरोधात पोलिसात तक्रार दिलेले विद्यमान ग्रा.प.सदस्य नितीन विजय महाजन व त्याच्या सोबत उपस्थित नेमीचद विक्रम महाजन,नितीन भिमराव पगारे, साक्षीदार विजय परशुराम महाजन, रवींद्र हिरामण बोरसे, प्रमोद शिवराम पाटील या सर्वांनी गावातील प्रथम नागरिक विद्यमान सरपंच श्री.राजेंद्र मोरे यांना ई-टेंडरिंग संदर्भात विचारणा केली असता. त्याचा रोष मनात ओढवून सरपंच महोदय यांनी संबंधित सदस्यांना व उपस्थित साक्षीदारांना तुम्ही आम्हाला विचारणारे कोण असा खडा सवाल करून अपमानित केले. मी गावाचा सरपंच आहे. मला जे पटेल ते मी करेन, अशी तंबी दिली. तुम्ही माझे नांदी लागले तर, तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तुमच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करेल अशी धमकी देखील दिली. सदर घटना दिनांक 1 फेब्रुवारी रोजी बहाल येथे घडली. याप्रकरणी भा.द.वी कलम 504,506 प्रमाणे फिर्यादी नितीन महाजन यांच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात विद्यमान सरपंच राजेंद्र मोरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात मेहूनबारे पोलिस स्टेशनशी संपर्क केला असता तपाशी पोलिस कर्मचारी धर्मराज पाटील यांनी संबंधित सरपंच यांना मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी बोलावले असल्याचे सांगितले. तर विद्यमान सरपंच राजेंद्र मोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सदर घटनेविषयी मला कुठलीच माहिती नाही असं सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!