शिव शंभो तरुण मिञ मंडळाची १९ वर्षाची अखंड ज्योतीची परंपरा
अखंड ज्योतीच्या स्वागतासाठी नगराध्यक्ष शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षांच्या हजेरी
प्रतिनिधी. संदीप कायगुडे
कर्जत: येथिल शिव शंभो तरुण मिञ मंडळ वाघवस्ती यांनी दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी आखंड ज्योतीचे आयोजन करण्यात आले. यावर्षी इंदापूर तालुक्यातील पिंपळे येथून पायी ज्योतीचे आयोजन करण्यात आले . या आखंड ज्योतीचे कर्जत शहरात आगमन होताच कर्जत नगर पंचायत चे प्रथम नगराध्यक्ष मा.नामदेव (देवा) राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष शेखर भाऊ खरमरे, भाजपा कर्जत शहराध्यक्ष गणेश आप्पा क्षिरसागर, मा. नगरसेविका सौ मनीषा सचिन सोनमाळी यांचे चिरंजीव युवा नेते पुष्कर शेठ सोनमाळी आदींनी फटाके फोडत जल्लोषात स्वागत करण्यात केले.
या मंडळाची स्थापना सन २००५ साली झाली. गेली १९ वर्षापासून नवरात्र उत्सवाचे अतिशय सुंदर असे नियोजन केले जाते, त्यामध्ये प्रत्येक वेळी प्रसिद्ध अशा आदीमाईशक्तीचा अवतार असणाऱ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणाहून सलग ३ वर्ष ज्योत आणली जाते,. १)सन २००५ ते २००७ श्री.क्षेत्र राशीन (जगदंबा देवी) येथुन सलग ३ वर्ष, २)सन २००८ ते २०१० श्री.क्षेत्र करमाळा (कमलाई देवी) येथून सलग ३ वर्ष, ३)सन २०११ ते २०१३ श्री.क्षेत्र पाथर्डी ( मोहटा देवी) येथून सलग ३ वर्ष, ४)सन २०१४ ते २०१६ श्री. क्षेत्र. कुरकुंभ (फिरंगाई देवी) येथून सलग ३ वर्ष, ५) सन २०१७ ते २०१९ श्री.क्षेत्र शृंगेरी देवी ( ब्रह्मगाव ता.आष्टी) येथून, व सन २०२० साली कोरोना महामारी मुळे शासनाच्या नियमाचे पालन करत ज्योत आणली नाही, सन २०२१ साली श्री.क्षेत्र पद्मावती देवीआई पिंपळे (भिगवन इंदापूर) येथून ज्योत आणली गेली,सन २०२२ साली काही अडचणी मुळे, नवरात्र उत्सव साजरा करता आला नाही,२ वर्ष अपवाद वगळता शिव शंभो तरुण मित्र मंडळ वाघ वस्ती च्या वतीने सलग १९ वर्ष नवरात्र उत्सव साजरा केला जातो आहे,तसेच पुढील वर्षी ही पिंपळे (पद्मावती देवी भिगवन इंदापूर) येथून ज्योत आणली जाईल असे मंडळाचे उपाध्यक्ष स्वप्नील वाघ यांनी माहिती देताना सांगितले.
वाघवस्ती येथील सभा मंडप मध्ये देवीची स्थापना करण्यात आली असून नऊ दिवस दिवस सभा मंडप समोर आराधी मेळे भरवून गाण्याचे कार्यक्रम घेतले जातात, तसेच मंडळाचे अध्यक्ष पंकज वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन केले जाते,
तसेच या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष पंकज वाघ, उपाध्यक्ष स्वप्नील वाघ, नयन शेठ खंदारे, गोपाल वाघ, दादा वाघ, मंगेश वाघ, रमेश वाघ, दत्ता वाघ, राजू येवले, कृष्णा क्षिरसागर, सोमा रासकर,प्रशांत वाघ, अशोक वाघ, विशाल वाघ, ऋषिकेश गोरे,रोहित वाघ, ऋषिकेश बरकडे, सार्थक भोगे, स्वप्नील कोरडे, दत्ता पिसाळ, सोमनाथ (गोट्या) राऊत,हर्षल खंदारे, अंगद क्षिरसागर,सुरज राऊत ,विलास आप्पा वाघ,आप्पा खरात,राहुल खरात, पृथ्वीराज वाघ, प्रथमेश वाघ, आदी तरुण सहभागी होते.