June 29, 2025 12:04 pm

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी बी एस इ )येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिवस “साजरा……

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी बी एस इ )येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिवस “साजरा……

अमळनेर; स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) येथे भारताचे पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे, उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर व प्राथमिक – माध्यमिक विभागातील शिक्षक वृंद यांनी मिसाइल मॅन डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण केली .त्यानंतर शाळेतील शिक्षकवृंद प्रतिभा पाटील, अश्विनी पाटील, यशस्वी चौधरी, यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. कलामांचा जन्मदिवस हा “वाचन प्रेरणा दिवस”म्हणून साजरा केला जातो हेही पटवून दिले .
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे यांनी अवकाश क्षेत्रातील अब्दुल कलामांचे योगदान याविषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले .उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांची महती वर्णन केली. वाचन करणे का गरजेचं आहे ?याचे महत्त्वही पटवून देण्यात आले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले .तसेच संपूर्ण कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!