June 29, 2025 3:08 am

भिगवण च्या डॉक्टर ची झाली बदली आणि पाहायला मिळाली आदिवासी भागातील परिस्थिती-डॉ. अमोल खानावरे

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण च्या डॉक्टर ची झाली बदली आणि पाहायला मिळाली आदिवासी भागातील परिस्थिती-डॉ. अमोल खानावरे

(निलेश गायकवाड )

…..मेळघाट…

ग्रामीण रुग्णालय चुरणी (चिखलदरा)…एक अविस्मरणीय अनुभव….

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक स्त्री रोग तज्ञ म्हणून मेळघाटातील माता मृत्यू व बालमृत्यू चे प्रमाण रोखण्यासाठी माझी प्रतिनियुक्ती ग्रामीण रुग्णालय चुरणी,तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती येथे करण्यात आली…
त्यानुसार मी भल्या पहाटे भिगवन वरून चिखलदराचा रस्ता समृद्धी महामार्गाने पार करत संध्याकाळी परतवाडा मार्गे संपूर्ण जंगलातून प्रवास करत 7.30 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय चुरणी गाठले… यातूनच परतवाडापासून 60 किलोमीटरच्या जंगलामधील घाबरत घाबरत केलेल्या संध्याकाळच्या संपुर्ण घाटातील प्रवासामध्ये दोन ठिकाणी फॉरेस्ट अधिकाऱ्यांचे तसेच तेथील फॉरेस्ट पोलीस यांचे गाडी चेकिंग झाले…

खरंच अजून मेळघाट हा परिसर संपूर्ण आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो कारण याच्या आसपास संपूर्ण जंगल व जंगलात वसलेले असे म्हटले तरी चालेल हे चूरणी गाव… येथे भौतिक सुविधांचा अभाव… दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ओपीडी तसेच डिलिव्हरी असे करण्याचे काम माझ्याकडे आले.. माझ्याबरोबर ग्रामीण रुग्णालय वेल्ह्याचे बालरोग तज्ञ डॉ शिवाजी हे होते… येथील आसपास संपूर्ण जंगल तसेच येथील लोकसंख्या जवळपास दोन ते अडीच हजार… अशातच आसपासच्या परिसरात फक्त दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व मोजकीच आरोग्य सुविधा…या गावांमध्ये एकही खाजगी हॉस्पिटल तसेच एकही मेडिकल उपलब्ध नाही.. त्यामुळे साधे डोकं जरी दुखले तरी येथील लोकांना ग्रामीण रुग्णालयात यावे लागते… रात्री आप रात्री येथे प्रसूतीसाठी येथेच स्त्रियांना आणले जाते.. येथे कुठलीही मेडिकल इमर्जन्सी आली तर येथून 35 ते 40 किलोमीटर वरती उपजिल्हा रुग्णालय आहे तर पेशंट तेथे पाठवले जाते… तर अशा दृष्टीने आम्ही दोघेजण स्त्री रोग तज्ञ व बालरोग तज्ञ म्हणून कामकाज पाहायला सुरू केले…

येथील लोकांची मानसिकता अशी आहे की काही जरी झाले तरी ती डिलिव्हरी नॉर्मल झाली पाहिजेत ऑपरेशन किंवा सिजर करण्यासाठी हे तयार होत नाहीत भले बाळाचे किंवा त्या मातेचे काही झाले तरी चालेल.. अशा परिस्थितीमध्ये आम्ही दोघे जण सरासरी रोज एक किंवा दोन डिलिव्हरी करत व बाळ आणि माता यांना आमच्या दृष्टीने सुखरूप ठेवण्याचा प्रयत्न करत… येथे कित्येक अशा डिलिव्हरी एक तर घरीच किंवा आसपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून साधारणता 20-25 किलोमीटर वरून येथे येताना ॲम्बुलन्स मध्येच होण्याचे प्रमाण जास्त आढळले….

येथे बाहेर आम्हाला साधा नाश्ता किंवा जेवण करण्यासाठी एकही हॉटेल उपलब्ध नाही ..यांना पोहे उपमा, इडली, डोसा असे पदार्थ जणू कधी ऐकले नाहीत किंवा बघितले तर त्याहूनही मुश्किल…
आम्ही जेवणासाठी येथील टिफिन म्हणजेच येथील भाज्या पूर्ण पहाडी किंवा जंगली भाज्या रानमेवा जास्तीत जास्त सेंद्रिय शेती असल्यामुळे आपल्या भाज्या आणि या भाज्यांच्या चवीमध्ये खूप फरक असा जाणवला…

येथील बालकांमध्ये कुपोषित असण्याचे प्रमाण सर्वात जास्त आढळले… त्यानुसार प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एनआरसी वॉर्ड म्हणजेच न्यूट्रिशनल रिह्याबिलिटेशन सेंटर उपलब्ध आहे ..त्यामध्ये बालकांना ऍडमिट करून तेथे उपचार देऊन घरी पाठवले जाते… आमच्या सोबत येथील मेडिकल ऑफिसर डॉ. दुर्वे हे सतत उपस्थित असायचे…

येथील भाग जरी आदिवासी किंवा मागासलेला व अत्यंत गरिबीचा असला तरी त्यांचा स्वभाव मात्र एकदम माणुसकीचा असा जाणवला… येथे लाईट व पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवतो… येथे अजून एकही पेट्रोल पंप नाही येथून साधारणतः 20 किलोमीटर वरती मध्य प्रदेश मध्ये जाऊन पेट्रोल किंवा डिझेल भरावे लागले….

येथील लोकांमध्ये जंगलातील वन्यप्राणी तसेच अस्वल यांनी हल्ला केलेले पेशंट किंवा साप चावलेले पेशंट यांचे प्रमाण सर्वाधिक आढळले….

सर्व मेडिकल सुविधा उपलब्ध असताना व काहीच सुविधा उपलब्ध नसताना सेवा देणे हे खरंच जिकरीचे काम असते हे यातून प्रखरतेने जाणविले…..

नवरात्र सारख्या पवित्र उत्सवात महिलेची डिलिव्हरी झाल्यानंतर आई आणि बाळ हे सुखरूप पाहून किंवा असून त्या मातेच्या व घरच्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपल्यालाही समाधान लाभले….

पण यातूनच मी माझे भाग्य समजतो की अशा परिस्थितीमध्ये एक स्त्री रोग तज्ञ म्हणून येथे सेवा देण्यात अत्यंत आनंद वाटला व आपल्या शिक्षणाचा योग्य उपयोग अशा लोकांमध्ये सेवा देण्यात झाला यात मी माझी पुण्याई समजतो….

आपलाच
— डॉ.अमोल खानावरे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!