June 28, 2025 8:01 pm

निर्वाण फाउंडेशनचा ‘राज्यस्तरीय सवित्रीज्योती सन्मान पत्रकार पुरस्कार अविनाश घोगरे यांना जाहिर….

अपनी भाषा में पढ़े! Translate

निर्वाण फाउंडेशनचा ‘राज्यस्तरीय सवित्रीज्योती सन्मान पत्रकार पुरस्कार अविनाश घोगरे यांना जाहिर….
दि 29 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे सदर पुरस्कार सोहळा होणार आहे

घनसावंगी प्रतिनिधी – निर्वाण फाउंडेशन नाशिक यांच्या कडून दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय सवित्रीज्योती सन्मान पत्रकार पुरस्कार २०२३ या वर्षीचा पत्रकार अविनाश घोगरे यांना
दि ३ऑक्टोंबर रोजी पत्राद्वारे पुरस्काराची घोषना करण्यात आली निर्वाण फाउंडेशन नाशिकच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संपादक,पत्रकार,वार्ताहर,यांच्या कार्याचा विचार करून ,त्यांच्या सामाजिक बांधिलकी चां सर्वांगीण विचार करून, त्यांच्या कृतुत्वाचा सन्मान म्हणून, त्यांच्या कार्याचे उचित मूल्यमापन व्हावे यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो पत्रकारिता क्षेत्रात अती उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,सामजीक प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून हिरारीने मांडणाऱ्या, आपल्या लेखणी च्या माध्यामातुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेणाऱ्या व समाजहित जोपासणाऱ्या व्यक्तीस राज्यस्तरीय सावित्रीज्योती सन्मान पुरस्कार घोषित करण्यात येतो ह्या वर्षीचा निर्वाण फाउंडेशनचा राज्यस्तरीय सावित्रीज्योती सन्मान पुरस्कार २०२३ पुरस्कार विजयाचे मानकरी घनसावंगी तालुक्यातील भूमिपुत्र पत्रकार अविनाश घोगरे हे ठरले आहेत पत्रकार अविनाश घोगरे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अनेक वर्षांपासून निर्भीड,निःपक्ष पत्रकारिता करीत आहेत, आपल्या पत्रकारितेतुन त्यांनी आजवर अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा विशेष सहभाग असतो व जनसामान्यांच्या विकासासाठी, न्यायासाठी आहोरात्र प्रयत्न करत असतात त्यामुळेच एकंदरीत त्यांच्या कार्याचा गुण गौरव म्हणूनच ते ह्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारा साठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील सर्व पत्रकार,घनसावंगी शहरातील लोकप्रतिनिधी,प्रतिष्ठित नागरिक यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!