शासकीय दवाखान्यामध्ये औषधांअभावी रुग्णांचा झालेला मृत्युबद्दल शासनाचा किसान काँग्रेसने निषेध व्यक्त करून दिलं निवेदन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शासकीय दवाखान्यामध्ये औषधांअभावी रुग्णांचा झालेला मृत्युबद्दल शासनाचा किसान काँग्रेसने निषेध व्यक्त करून दिलं निवेदन..

अमळनेर : विक्की जाधव..

नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे एकाच दिवशी 24, रुग्ण दगावले आहेत. त्यात निम्मे संख्या ही नवजात शिशुंची आहे. ही विकसीत असलेल्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी बाब आहे. सरकारी धोरण हे खाजगी आरोग्य क्षेत्राचा धंदा वाढावा किंवा सरकारी दवाखान्यांचे खाजगी करन करावे असेच असल्यामुळे सरकारी


दवाखान्यात येणा-या गरीबांना औषध पुरवठा जाणीव पुर्वक टाळला जात आहे नोकर भरती मुद्दाम केली जात नाही आणि चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची नोकर भरती केली जात नाही तसेच
डॉक्टरांची देखील भरती केली जात नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

तरी गरीबांच्या आरोग्याशी, जिवांशी खेळणा-या शासनाचा आम्ही धिक्कार करीत आहोत. आज शासनास विनंती की, तात्काळ वरील प्रमाणे कार्यवाही आपले स्तरावरुन करावी ही किसान काँग्रेस अमळनेर जि.जळगांव यांचे मार्फत आपणास विनंती करीत आहेत. अशा अशायाचे निवेदन प्रांतधिकारी यांना देण्यात आले यावेळी किसान काँग्रेस अध्यक्ष सुरेश पिरान पाटील.  संचालक कृ उ बा स सुभाष सुकलाल पाटील डॉ. अनिल शिंदे, धनगर दला पाटील,  जैन मन्साराम पाटील निळकंठ सोनू पाटील, प्रताप धनराज पाटील,  प्रभाकर शंकर पाटील, प्रवीण गंगाराम पाटील प्राध्यापक श्याम साहेबराव पवार,  बी.के सुरवंशी, भागवत गुरुजी, नानासाहेब डीडी पाटील इत्यादी उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!