गाव जोडो युवा जोडो रासपाच्या अभियानाला इंदापूर तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद ……
राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर तालुका युवा अध्यक्ष आकाश पवार.
निरा नरसिंहपुर: दिनांक-4 प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
इंदापूर तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा अध्यक्ष आकाश पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गाव जोडो -युवा जोडो असा एक उपक्रम राबवला होता . याच्यामध्ये कळंब- वालचंदनगर ,बावडा- सराटी, गणेशवाडी , पिंपरी बुद्रुक ,टनु, गिरवी आणि निरा नरसिंहपुर गावांमध्ये युवकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्याच्यावर चर्चा करण्यात आली. शासनाने लवकरात लवकर बेरोजगार युवकांसाठी भरती प्रक्रिया राबवावी त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यामध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आणाव्या व बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून द्यावा. तसेच इंदापूर तालुक्यामध्ये बेरोजगार युवकांना उद्योगधंदे उपलब्ध करून देण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. सरकारने जर आपली मागणी मान्य केली नाही तर मैदानात उतरून मोठमोठ्या प्रकारची आंदोलने करू असे आकाश दादा पवार यांनी म्हटले . या अभियानाला इंदापूर तालुक्यातून भरघोस असा प्रतिसाद मिळालेला असून आकाश दादा पवार यांचे काम हे खूप छान आणि लोकांच्या हिताचे आहे असे युवकांमधून बोलले जात आहे. भविष्यामध्ये नवयुवकांसाठी आकाश दादा पवार हे चांगले मार्गदर्शक असणार आहेत याच्यात काही शंका वाटत नाही . आकाश दादा पवार यांच्या समाजातील बेरोजगार युवकांविषयी वाटणारी आत्मीयता ही अतिशय चांगली गोष्ट आहे. सर्व गावांतील युवकांनी आकाश दादा पवार यांचे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.