June 29, 2025 7:50 am

भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांचा 79 वा वाढदिवस सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांचा 79 वा वाढदिवस सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा.

प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158 / 7385240015

दौंड – दौंड शहरातील भिमथडी शिक्षण संस्था, नागरीक हित संरक्षण मंडळ, आर.पी.आय. आठवले गट यांचे संयुक्त विद्यमाने दौंड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रेमसुखजी कटारिया यांचा सत्कार दौंड विधानसभा सदस्य राहुल कुल यांचे हस्ते करण्यात आला.याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र कंद, संचालक सुदर्शन चौधरी, भीमथडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एल एस बिडवे, दौंड नगरीच्या माजी नगराध्यक्षा शितल कटारिया संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद अगरवाल चेअरमन विक्रम कटारिया,ज्येष्ठ विधितज्ञ सुधीर पाटसकर, माजी नगरसेवक योगेश कटारिया संस्थेचे पदाधिकारी, सर्व शाखांचे शाखाप्रमुख,शिक्षक वृंद व उपस्थित होते तसेच प्रेमसुख कटारिया यांना मानणारे दौंड शहर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.संदीप
पंचवाटकर प्रस्तुत ‘ये श्याम मस्तानी’ या गीत नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा आस्वाद या प्रसंगी नागरिकांनी घेतला.
मोफत साडी वाटप, अन्नदान ,यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्यात आले होते, अल्पदरात सायकलचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक नवनाथ कदम,उपशिक्षक संतोष सोनवणे,वैभव पाटील यांनी केले.यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!