June 29, 2025 2:58 am

अमळनेर : तालुक्यातील मालपूर येथील मूळ रहिवासी असलेले डॉ नरेंद्र शांताराम पाटील यांची गुजरात मधील सुरत महापालिकेच्या उपमहापौरपदी निवड..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर : तालुक्यातील मालपूर येथील मूळ रहिवासी असलेले डॉ नरेंद्र शांताराम पाटील यांची गुजरात मधील सुरत महापालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाल्याने तालुक्यात आनन्द व्यक्त करण्यात आला आहे. 

अमळनेर : विक्की जाधव..

डॉ नरेंद्र पाटील हे उदना लिंबायत भागात नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

     

डॉ नरेंद्र आणि त्यांच्या पत्नी गेल्या २५ वर्षांपासून भाजप च्या पदाधिकारी असून समाजसेवेत अग्रेसर आहेत.

तसेच ते वैद्यकीय व्यवसायातून देखील जनतेची सेवा करत आहेत. त्यांच्या जनसेवा वृत्तीमुळेच पक्षाच्या वरिष्ठांनी प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या निर्देशानुसार त्यांच्यावर सुरत महापालिकेची उपमहापौर म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

डॉ नरेंद्र पाटील यांच्या निवडीने खान्देशातील गुजरात येथील नागरिकांच्या समस्या सुटण्यास मार्ग सुकर झाला असल्याने खान्देशवासीयांना आंनद झाला आहे.

मालपूर सारख्या एका लहान गावातील अहिराणी भाषिक व्यक्तीला गुजरात मधील मोठ्या शहराची उपमहापौर पदाची जबाबदारी दिल्यामुळे नरेंद्र पाटील यांच्यामुळे अमळनेर तालुक्याची मान उंचावली आहे. त्यांच्यावर तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!