राष्ट्रीय कराटे स्पर्धेत स्वामी विवेकानंद शाळेचे विद्यार्थी चमकले…….

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत स्वामी विवेकानंद शाळेचे विद्यार्थी चमकले…….

अमळनेर; राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा भुसावळ ,येथे सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया शांतोकोण कराटे असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या यात विविध भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला यात अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फार मोठे यश संपादन केले. राष्ट्रीय कराटे स्पर्धेत विजयी झालेले खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे ;आरुष विनोद अमृतकर [सुवर्ण व कांस्यपदक], प्रियम प्रशांत शिंदे [सुवर्ण व रौप्य ],आर्या राजेंद्र देशमुख [सुवर्ण व कांस्यपदक], हिंदवी विजय निकम [दोन रौप्य पदक] खेळाडूंनी कुमिती फाईट व कांता या दोन स्पर्धेत सहभाग घेतला होता . त्यांना फार मोठे यश मिळाले यावेळी क्रीडा शिक्षक सुनील करंदीकर व योगेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे, उप मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विजयी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!