अमळनेर शहरात सुप्रसिद्ध सायकलचा ब्रँड असलेल्या रायडर्स सायकलच्या दुसऱ्या शोरूमचा नुकतीच शुभारंभ सिने सृष्टीतील नामवंत अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते अमळनेरकरांच्या साक्षीने हा आनंद सोहळा पार पडला.
अमळनेर : विक्की जाधव..
11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडला हा उद्घाटन समारंभ. शहराच्या मध्यवर्ती मुख्य बाजारात हे शोरूम उभारण्यात आले असुन रायडर सायकलच्या सायकली, तरुणाईसाठी आज स्टाइल आयकॉन ठरल्याने त्यांनी अमळनेरच्या तरुणांच्या आयुष्यात नवं ग्लॅमर आणलं आहे. विजय मारुती मंदिरा शेजारील रायडर सायकलच्या पहिल्या शोरूमला अमळनेरकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने
मालक सोहम संजय दुसाने यांनी आपल्या नव्या
शोरूम मध्ये सायकलिंगच्या क्षेत्रात झालेली
क्रांती, त्यात आलेली अत्याधुनिक आणि ब्रँडेड कंपनीच्या, गिअर सायकल , इलेक्ट्रॉनिक सायकल, एक्सरसाईज जिमसाठी लागणाऱ्या सायकलस अशा विविध प्रकारच्या सायकलीं विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.
रायडर सायकलमुळे विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठांच्या आयुष्यात सायकल वेगानं परतली असून, सायकलिंगचं व्यसन तरुणांना फिटनेसकडे घेऊन जात आहे. अमळनेर शहर आणि तालुक्यातील तरुणाईच्या पसंतीला उतरलेल्या रायडर सायकलच्या शोरूम मधून आपण खरेदी केलेल्या सायकलवर २०% सवलत देखील सुरुवातीच्या काही ग्राहकानां मिळणार आहे. असे रायडर सायकलचे संजय दुसाने यांनी सांगितले. चला तर वाटकसली बघतायं.. रायडर सायकलच्या शोरूम ला निश्चितच भेट द्या,
किशोरी शहाने यांनी दिली मंगळग्रंह संस्थान येथे
सदिच्छा भेट..
रायडर सायकलचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी किशोरी शहाने यांनी मंगळग्रंह संस्थान येथे सदिच्छा भेट दिली. येथे एक आगळेवेगळे व लौकिकप्राप्त श्री मंगळग्रह मंदिर आहे. मला आपसूकच मंदिराला भेट देण्याची इच्छा झाली. मी भेटही दिली आणि दर्शन, पूजा, महाआरती करण्याची संधीही मला मिळाली. त्यामुळे मनाला खूपच सकारात्मक शांती लाभली,
असे भावोद्गार सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांनी काढले. त्या म्हणाल्या, की आयुष्यात मंगळपूजाही केली जाते, याबाबत मला फारसे माहीत नव्हते. याबाबत जेव्हा मी माझ्या ज्योतिषतज्ज्ञांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, की आयुष्यात दोष असो वा नसो, प्रत्येकाने श्री मंगळग्रह मंदिरात जाऊन पूजा, अभिषेक केलाच पाहिजे. माझ्या साठी ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. त्यानुसार आवर्जून येथे दर्शन आणि महाआरती करवून घेतली. पुढच्यावेळी अभिषेक वगैरेही करीन असे त्या म्हटल्या.