June 29, 2025 8:31 am

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय वर ” निदर्शने आंदोलन”

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय वर ” निदर्शने आंदोलन”

:-आज दि.१२/०९/२०२३ वेळ सकाळी ११.०० वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे येथे आदरणीय डॉ.बबनराव तायवाडे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रिय ओबीसी महासंघ यांच्या आदेशाने व श्री.चेतन नागोरावजी शिंदे प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रिय ओबीसी युवा महासंघ यांच्या मार्गदर्शनात ओबीसी आरक्षण व इतर न्यायिक मागण्या साठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय वर आज निदर्शने आंदोलन करण्यात आहे. कार्यालय समोर निदर्शने करून मा.राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन सादर करण्यात आले. आपल्या मागण्या शासनाला तात्काळ पाठविण्यात येतील याबाबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी शिष्टमंडळाला आश्र्वाशीत केले.
आंदोलनात सुनील पंडित, संदीप नाना चिलेकर, सुनिल शिंदे, बाबुराव लष्करे, अशोक वाघमारे, गहीनिनाथ राजे, हरिभाऊ काळे, सौ.सुवर्णाताई सावर्डे,दत्ता पवार, गणेश शिंदे, ॲड.अमोल नवले, श्रीरंग मोरे, सुधीर लोणकर , राजन लोणकर, सचिन काळे,संतोष मगर, गणेश शिंदे , सुनिल गोरे आणि बाल आंदोलक श्रीराज शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
आंदोलन ओबीसी आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याचा शासनाने अध्यादेश काढावा व मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असे आरक्षण द्यावे तसेच केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!