June 29, 2025 5:12 pm

जयश्री सरके यांना साहित्यिक शिक्षक पुरस्कार प्रदान

अपनी भाषा में पढ़े! Translate

जयश्री सरके यांना साहित्यिक शिक्षक पुरस्कार प्रदान

(निलेश गायकवाड )

मराठी अध्यापक संघ पुणे शहर यांच्या वतीने दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार व साहित्यिक शिक्षक पुरस्कार हा सन्मान सोहळा 10 सप्टेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिगवण शाळेतील शिक्षिका श्रीम् जयश्री बबन सरके-मारकड यांना हा साहित्यिक शिक्षक पुरस्कार मिळाला.जयश्री सरके यांनी आजपर्यंत सकाळ वर्तमानपत्र, जीवन शिक्षण मासिक, शिक्षक ध्येय साप्ताहिक तसेच रयतेचा वाली साप्ताहिक या अंकांमध्ये अनेक लेखांचे लेखन केले आहे. तर त्यांचे भाषणातून भविष्य हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झाले आहे. त्यांच्या या साहित्य लेखनामुळे हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.

आमदार रवींद्रजी दंगेकर, संघाचे संस्थापक व विश्वस्त हनुमंत कुबडे सर, अध्यक्षा कल्पना शेरे मॅडम, संघाच्या सचिव व आपटे प्रशालाच्या प्राचार्या सिन्नरकर मॅडम तसेच कार्याध्यक्ष सौ लीना कारले मॅडम, कार्यवाहक लीलाधर गाजरे सर, माननीय अमित गुंजाळ सहाय्यक आयुक्त परीक्षा परिषद पुणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जयश्री सरके यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!