June 30, 2025 5:17 am

भिगवण रोटरी क्लब च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी;78 नागरिकांनी घेतला लाभ

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण रोटरी क्लब च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी;78 नागरिकांनी घेतला लाभ

(निलेश गायकवाड )

मोफत आरोग्य तपासणी शिबिर
रोटरी क्लब ऑफ भिगवन, ग्रामीण रुग्णालय भिगवन व वाहतूक नियंत्रक परिवहन महामंडळ भिगवन यांच्या संयुक्त विद्यमाने 11 सप्टेंबर वार सोमवार रोजी STबस चालक व वाहक तसेच उपस्थित प्रवाशांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले
या शिबिरामध्ये शुगर तपासणी ,ब्लड प्रेशर या तपासण्या व आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले सकाळी 10ते 2या वेळेमध्ये साधारण 78 लोकांची तपासणी करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने भिगवन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन विभुते वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक देशपांडे डॉ अमोल खानावरे तसेच अधिपरीचारिका रेश्मा निळे प्रियदर्शनी शिंदे जया गायकवाड लॅब टेक्निशन शिवांजली वाकळे यांनी तपासणी केल्या… यावेळी भिगवन ग्रामपंचायत चे सरपंच व सर्व सदस्य यांनी शिबिराला भेट दिली तसेच इंदापूर बस आगार चे डेपो मॅनेजर श्री गोसावी साहेब यांनीही भेट दिली.


यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष रणजीत भोंगळे यांनी सर्वांचे आभार मानले व आज दैनंदिन जीवनामध्ये एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने बस चालक व वाहक यांच्यावरील ताण वाढत आहे हे लक्षात घेता त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लबचे सर्व सदस्य व भिगवन बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री एन एम राऊत यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!