June 29, 2025 8:00 am

युतीच्या माध्यमातूनच पीपल्स रिपब्लिकन पार्टी आगामी निवडणुका लढविणार ?चरणदास इंगोले

अपनी भाषा में पढ़े! Translate

युतीच्या माध्यमातूनच पीपल्स रिपब्लिकन पार्टी आगामी निवडणुका लढविणार ?चरणदास इंगोले

यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभेच्या दोन जागा लढवण्याची तयारी!

रजत डेकाटे प्रतिनिधी -(यवतमाळ) आगामी काळातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह लोकसभा विधानसभा या सर्व निवडणुका माजी खासदार प्रा .जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत महायुतीत राहूनच लढविणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी यवतमाळ येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली आहे.
दिनांक 9 सप्टेंबर 2023 शनिवार रोजी दुपारी एक वाजता संविधान चौकातील लॉर्ड बुद्ध विहार यवतमाळ येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डी .जे.खडसे( गुरुजी) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सहसंघटक राजरत्न गणवीर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली., यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बैठकीत बोलताना चरणदास इंगोले यांनी सांगितले की ,मित्रपक्ष म्हणून महायुतीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित जागा मिळाव्यात त्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे .तथापि निवडणूक पूर्वतयारी म्हणून पक्षाध्यक्ष प्रा .जोगेंद्र कवाडे सर यांनी राज्यामध्ये लोकसभेच्या 4आणि विधानसभेच्या 55 जागा लढविणार असल्याचे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने तयारी केल्या जात आहे.यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील विधानसभेच्या 2 जागा लढविण्याची तयारी ठेवावी आणि त्या दृष्टीने दोन विधानसभा क्षेत्र निश्चित करून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा मेळाव्याचे आयोजन करून निवडणूक पूर्वतयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तालुका अध्यक्ष व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे अशा सूचनाही या बैठकीत बोलताना चरणदास इंगोले यांनी दिल्यात. बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश मेश्राम जिल्हा महासचिव रवी श्रीरामें ,विभागीय संघटक भीमदास नाईक ,जिल्हा उपाध्यक्ष एन .जे.स्थूल, यवतमाळ शहराध्यक्ष बाबाराव दुपारे ,आनंद शेजव नेर ,अशोक वाकोडे आरणी, कृष्णा रंगारी बाबुळगाव, प्रल्हाद शिसले घाटंजी, देवेंद्र खडसे पुसद ,चिंतामण खाडे पांढरकवडा, भीमराव लढे राळेगाव, राजू लोहोकरे दारवा, विकास खडसे महागाव, नासिरभाई ,माणिक खाडे ,रमाबाई सोनटक्के राजू खडसे यांचे सह अन्य कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!