June 29, 2025 3:16 am

परांडा येथे विविध कार्यक्रमाने दहीहंडी उत्साहात साजरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

परांडा येथे विविध कार्यक्रमाने दहीहंडी उत्साहात साजरी..


प्रतिनिधी:- अजिनाथ कनिचे
परांडा येथे गोपाळकाला निमित्त प्रथमच विविध कार्यक्रमाने गुरुदास कांबळे स्पोर्ट फाउंडेशन परंडा यांच्या वतीने विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रम पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून महिला, मुले, युवा तरूण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा दहीहंडी सोहळा जातीय सलोखा जोपासत सर्व धर्मातील जनलोक उपस्थित होते. यावेळी गुरुदास कांबळे स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष पैलवान अक्षय शिंदे यांची या ठिकाणी मोलाची कामगिरी होती तसेच फाउंडेशनचे इतर सर्व सदस्य व मॅनेजर अविनाश टेकाळे यांनी अतोनात कष्ट करून कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडण्याची जबाबदारी घेतली होती.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत राष्ट्र समितीचे रामजीवन बोंदर साहेब व त्यांचे सहकारी तसेच तालुक्यातील नामवंत आनंद राशिनकर साहेब, कालुभाई सौदागर, डॉ. आनंद मोरे, डॉ. काळे, उद्योजक सागर गवारे, उद्योजक (गोल्डन मॅन वस्ताद) माऊली गोडगे, राहुल गवळी, खलील खान, इम्रान पठाण व हजारो युवक या ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!