June 28, 2025 6:47 pm

सोनोग्राफीसाठी ३५ ते ४० दिवस विलंब का ? शिवसेना (उ.बा.ठा) प्रणित शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

अपनी भाषा में पढ़े! Translate

सोनोग्राफीसाठी ३५ ते ४० दिवस विलंब का ? शिवसेना (उ.बा.ठा) प्रणित शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात अनेक समस्यांचा डोंगर आहे त्यात आता नव्याने एक समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे.सोनोग्राफी ज्या रूग्णाला अत्यावश्यक आहे.त्या रूग्णाला तब्बल ३५ ते ४० दिवसांसाठी प्रलंबित (वेटींगवर ) ठेवले. जात आहे.यामुळे अनेक गरजु रूग्णांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.त्यातच काही रूग्णाच्या नातेवाईकांनी शिवसेना – शिव आरोग्य सेनेच्या कार्यालयात संपर्क साधुन सदर समस्या कळवली असता यावर शिव आरोग्य सेना संतप्त झाली आणि त्यांनी हिरे सर्वोपचार रूग्णालयात धाव घेतली. आणि रूग्णालयाचे अधिष्ठता श्री.मोरे यांना धुळे शहराचे आमदार फारूक शहा यांच्या समक्ष सदर विषयाचे निवेदन दिले.लवकरच या निवेदनाची दखल घेऊन रुग्णालयात वाढलेली रूग्णांची लक्षात घेऊन सोनोग्राफी मशिन व मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.यावेळी शिवसेना – शिव आरोग्य सेना जिल्हा समन्वयक शुभम मतकर, समन्वयक सचिव सागर मोरे, धुळे महानगर समन्वयक आशु भडागे,महानगर सचिव ललित चित्ते, शिवसेना विभागप्रमुख नितीन जडे,निखील धुमाळ,रीतेश फणसे,गणेश पाटील,प्रशांत पाटील हे उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!