June 28, 2025 6:38 pm

शिवसेना पक्षाच्या शिरपूर तालुक्यात दोन शाखांचे अनावरण

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसेना पक्षाच्या शिरपूर तालुक्यात दोन शाखांचे अनावरण

शिरपूर प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यात शिवसेना ( उ.बा.ठा) या पक्षाच्या बांधणीसाठी व तळागाळातील लोकांपर्यंत व ग्रामीण भागातील सामान्य माणसापर्यंत पक्षाच्या विस्तार वाढवून पक्षाची ध्येय धोरणे तू आगामी काळातील वाटचाल याबाबत जनतेत संदेश जाण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या मोहिमे अंतर्गत प्रत्येक विभाग जनसंपर्क वाढवून शाखा विस्तार करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

या आदेशाचे पालन करत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शिवसेना पक्षाच्या तालुक्यातील बभळाज, नागेश्वर बंगला येथे शेकडो युवकांच्या साक्षीने शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या शाखांचे अनावरण विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र धनावडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमांतर्गत नागेश्वर बंगला, बभळाज येथील शाखाप्रमुख व उपशाखाप्रमुख यांच्या नियुक्ती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.बभळाज शाखाप्रमुख म्हणून आकाश भिल व उपशाखाप्रमुख म्हणून मुकेश महानोर, नागेश्वर बंगला शाखाप्रमुख दिलीप शिंदे तर उपशाखाप्रमुख प्रशांत गुजर यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आहे.

याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत ,उप जिल्हा संघटक विभा भाई जोगराना, विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू सिंह राजपूत, तालुकाप्रमुख अत्तर सिंह पावरा, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, माणिक गुजर, नाना गुजर, एन डी पवार, नन्हा जाधव,सोमा पाटील ,देवा बंजारा, प्रदीप राजपूत,सचिन चौधरी,अमोल पाटील, भीमसिंग कर्नल, यांच्यासह परिसरातील असंख्य शिवसैनिक यावेळेस उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भटू शिंदे राहुल गुजर यांनी केले होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!