प्रतिनिधि/सचिनमुधळे
आज दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी औंढा(ना.) येथे मा.श्री.विनायकरावजी भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख,हिंगोली.यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुकास्तरीय विविध पदांवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.श्री.सुखदेव रामकिशन कोकाटे यांची शिवसेना औंढा(ना.)तालुका समन्वयक पदी तर श्री.रविकुमार डोंगरदिवे यांची शिवसेना औंढा(ना.)दलित आघाडी तालुका प्रमुख या पदी निवड करण्यात आली. यावेळी माननीय श्री विनायकरावजी भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख,हिंगोली.यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर- मा.श्री.विनायकरावजी भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली.मा.श्री.जी.डी.मुळे काका(उपजिल्हाप्रमुख),मा.श्री.गणेश देशमुख(तालुकाप्रमुख),मा.श्री.डॉ.चंद्रमणी पाईकराव (उपतालुकाप्रमुख),मा.श्री.अनिल दादा शिंदे(तालुका संघटक),अलीम खतीब(अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख)मा.श्री.सुनील खंडागळे(तालुका संघटक दलित आघाडी),मा.श्री.सुखदेव कोकाटे(तालुका समन्वयक),मा.श्री.रविकुमार डोंगरदिवे(दलित आघाडी तालुकाप्रमुख),आसिफ पठाण व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..