बदमाश मुळ्येला अटक कधी
निलंबनास विलंब का होत आहे ?
उल्हासनगर महापालिकेतील महाबदमाश नगर रचनाकार प्रकाश मुळ्ये याच्या विरोधात “वैयक्तिक स्तरावर ४ खाजगी व्यक्ति नगर रचना विभागात नेमुन गेले सव्वा वर्ष जे थैमान घातले होते,त्याचा पर्दाफास नुकताच झाला.या महाबदमाश मुळ्येवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. परंतू पोलीस खाते ढिम्मपणे तपासाच्या नावाखाली या मुळ्येचा अटकेपासून बचाव करीत आहे.भोगसम्राट युवराज भदाणे प्रकरणी जे पोलीसांनी केले त्याचाच कित्ता पोलीस गिरवत आहेत.एखाद्या जुगार अड्यावर वा डान्सबारवर धाड टाकून शिताफिने अटक करणा-या पोलीसांना या मुळव्याधीस अटक करताना काय रोग भरतो ?
तोच प्रकार महापालिका आयक्त अजिबो गरीब शेख यांचा.
महापालिकेच्या दप्तरी नोंद नाही, नेमणुकीचे आदेश नाहीत, तरी या मुळ्येचे हस्तक सव्वा वर्ष बिनबोभाटपणे महापालिकेच्या गोपनीय फाईली व संगणक हाताळतात तरी ते आयुक्तांच्या लक्षात येत नसेल तर प्रशासन किती कुचकामी आहे, हेच सिद्ध होते. महापालिकेचा एक अधिकारी यापैकी एकाला मुळ्येचा खाजगी ड्रायव्हर म्हणतो. दोन आमदारांनी सव्वा वर्षापुर्वी लेखी पत्र देऊन या बोगस कर्मचा-यांची नावं कळवूनही ३ महिन्यापासून हे कर्मचारी काम करीत असल्याचा खोटा अहवाल देणारे अधिकारी या भामट्याची कशी पाठराखण करतात, हेच दिसून येते.
या प्रकाश मुळ्ये नावाच्या रानडुक्कराला वेतन किती असेल तर ८० ते ९० हजार. मग हा रानडुक्कर चार पाच कर्मचा-यांना दरमहा एकुण १ लाखावर स्वत:च्या खिश्यातून वेतन देतो मग हे पैसे तो भडवेगिरी करूनच मिळवत असेल आणि अशा भडव्या विरोधात महापालिका आयुक्त निलंबन कारवाई करीत नसतील तर ते या भडव्याचे रक्षणकर्ते आहेत, अशी लोकभावना झाली तर दोष कोणाचा ?
राहुल जोते हा या भामट्याचा ड्रायव्हर नसून तो (वसूली) कलेक्टर आहे. राहुल जोते व या बदमाश मुळ्येने दुबई,सिंगापुर वारी केली की नाही हे त्यांच्या पासपोर्टवरून तपासता येईल.
मुळ्येचा खाजगी ड्रायव्हर प्रतिक याची इनोव्हा कार नं.8200 कोणत्या बिल्डरने लाचेखातर दिली ? याची चौकशी झाली पाहिजे.
चक्क रस्त्यांच्या जागेवर बांधकाम परवानगी देणा-या या भामट्याने गेल्या २/ २.५ वर्षात जे नकाशे मंजूर केले, टिडीआर दिला आहे, साईड मार्जिनचा लाभ दिला आहे, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
मुख्यमंत्र्यांना सोन्याची मूर्ती गिफ्ट दिली म्हणून याच्या पापराशींवर मुख्यमंत्री जर संरक्षण देणार असतील तर त्या गिफ्ट मधील गणपतीचा कोप होऊन मुख्यमंत्रीपद भस्मसात होईल, ही माझी आकाशवाणी गांभीर्याने घ्यावी.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
५ ऑगस्ट २०२३